ग्रामपंचायत रानवड

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य रानवड, पर्यटन समृद्ध रानवड"

रानवड , ता. निफाड, जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm

ग्रामपंचायत प्रशासन

अ.क्र.सन्मा. सदस्याचे नावपदभ्रमणध्वनी क्रमांक
1गायकवाड संगीता सिद्धार्थसरपंच8605898692
2वाढवणे गणेश दादाउपसरपंच8329055390
3वाघ बाळासाहेब परशरामसदस्य9822967057
4सोमवंशी माधुरी योगेशसदस्य9960935527
5वाघ विलास गंगाधरसदस्य9850036313
6वाघ सचिन अशोकसदस्य9850303082
7वाघ वंदना प्रदीपसदस्य9270774525
8वाढवणे राजश्री संजयसदस्य7020002146
9पवार सागर रोहिदाससदस्य9146277647
10वाघ दीपिका ओंकारसदस्य7776854397
11जाधव उषा विलाससदस्य9922718941
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

रानवड  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. रानवड  गावात सोमेश्वर महादेव मंदिर, मारुती मंदिरामध्ये श्री राम, सीता, लक्ष्मण व विठ्ठल रुक्मानी यांचे मंदिरे आहे  शनीमंदिर  असून हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३६८५ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ , अंगणवाडी केंद्रे ४  व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावामध्ये सन २०१८ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत रानवड   ने खास ग्रामस्थांसाठी RO प्लांट बसविलेला असून गावातील १००% कुटुंब RO च्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच  मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत

  1. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष ऊस कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात
  2. रानवड ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रानवड  गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ११ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
  3. रानवड येथे कर्मावरी काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान आहे. कारखान्यामुळे रानवड मधील व इतर गावांमधील ऊस उत्पादक यांना उत्पन्न मिळते तसेच अनेक बेरोजगारांना रोजगार मिळतो तसेच परिसरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच रासाका परिसरातील गावांच्या विकासालादेखील हातभार लागणार आहे. तसेच अनेक तरुण या परिसरात छोटे-मोठे व्यवसायदेखील करणार असल्याने रानवड  गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

गावाचा परिसर डोंगराळ, सुपीक आणि पावसाळी हवामानासाठी प्रसिद्ध आहे. जवळच ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरी नदीचा उगमस्थान आणि अनेक धार्मिक तसेच नैसर्गिक स्थळे असल्यामुळे खरोलीचे महत्त्व अधिक आहे.

भौगोलिक स्थान

रानवड  हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ   १५७२  हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ४ वार्ड आहेत. एकूण ७२२  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ३६८५  आहे. त्यामध्ये १८९२ पुरुष व १७९३ महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावामधे कराबाई नदी असून  ओझरखेड बंधारा  पाट हा ६ किमी असून रोटेशन मध्ये ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

रानवड  गाव द्राक्ष कांदा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

रानवड येथील प्रेक्षणीय स्थळे माहिती खालीलप्रमाणे आहे
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
49

गावातील पंपगृह

48

प्राथमिक शाळा

वृक्ष लागवड

योगा दिवस साजरा

शाळातील मैदानी खेड

प्रधानमंत्री योजना मिटिंग

स्वछता मोहीम

कचरा ट्रॉली

शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा

वाचनालय

काकासाहेबनगर विद्यालयात विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिकांचे अनोखे अविष्कार

Plastik bandi नोटीस v प्रबोधन

वृक्षारोपण करताना

आरोग्य शिबीर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3

फोटो गॅलरी